राज ठाकरेंची भेट घेताना मुख्यमंत्री शिंदे मुंबईShinde Thackeray Meeting :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (गुरुवारी) पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठी पाट्या, टोल आणि धारावी पुनर्विकासाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मनसे नेत्यांकडून दिली जात आहे. मात्र, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (MNS Leader Bala Nandgaonkar)
पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचं स्वागत :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी आज भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते.
मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा :या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर, रस्त्यांची दुरवस्था आणि टोलच्या विषयावर तसंच मराठी पाट्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत कल्याण आणि डोंबिवली मतदार संघाच्या नागरी समस्यांसह राम मंदिराच्या विषयावर चर्चा झाल्याची माहितीही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
शिंदे-ठाकरेंमध्ये वारंवार भेटी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये भेटी सुरू आहेत. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मार्च 2023 मध्ये राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. यावेळी मराठी पाट्यांचा विषय चर्चेला गेला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2023 आणि रोजी सह्याद्री अथितीगृहावर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर ७ जुलै 2023 मध्ये दोघांची भेट राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या घरी झाली होती. त्यानंतर २ डिसेंबर 2023 आणि 28 डिसेंबर 2023 रोजी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी येऊन भेटले आहेत. विविध कारणांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री भेटत असले तरी यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा:
- भाजपाने प्रभू श्रीराम यांना एकाप्रकारे किडनॅप केलं-संजय राऊत
- आमदार अपात्र सुनावणी प्रकरण : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वर्षभर राहिले चर्चेत, भूमिकेवर सरकारचं भवितव्य
- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत दुसरीकडं जाण्याचा विचार नाही : बच्चू कडूंनी केलं स्पष्ट