मुंबईशिवसेना आणि दसरा मेळाव्याच (ShivSena Dussehra Gathering) एक अतूट नातं आहे. मात्र, यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमनेसामने (Shinde vs Thackeray over Dussehra gathering) आल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळाव्याला (Dussehra Gathering Shivaji Park) परवानगी मिळावी, (Dussehra Gathering Permission Application) यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला आहे. अद्याप कोणालाही परवानगी मिळाली नसल्यानं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोर्टात जाण्याचा शिंदे गटाचा इशारा(Shinde Group Warns Going To Court On Dussehra Gathering) मागील ५६ वर्षे शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत असून यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो शिवसैनिक (ShivSainik) उपस्थित राहतात. शिवसेना आणि दसरा मेळावा एक अतूट नाते आहे. यंदा मात्र, शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा कोणी घ्यायचा ? यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे गट आमनेसामने आला आहे. मेळाव्याच्या परवानगीसाठी पालिकेकडे दोन्ही गटांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, परवानगी कोणाला द्यायची यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे सर्व सुरु असताना शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे ३० ऑगस्ट रोजी अर्ज केला आहे.
सदा सरवणकर म्हणाले की,दरवर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी मी अर्ज केला आहे. शिवसेनेमध्ये कोणतेही गटतट नसून एकच शिवसेना आहे. एक नैतृत्व, एक मैदान, एक झेंडा, एक विचार हे यंदाच्या दसरा मेळाव्याचे घोषवाक्य आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) मार्गर्शन करतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून गेले दोन वर्षे सभागृहात मेळावा साजरा केला जात आहे. हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला आहे. असे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी संगितले. जर आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराचं यावेळी सरवणकर यांनी शिंदे गटाच्या वतीने दिला.