मुंबई Shinde Group Protest Against Sanjay Raut:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटानं आज अनोखी निदर्शनं केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्वस्त्राबाबत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य : एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळाचं चिन्ह असेल, ते एकदा पहावं लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेची दखल, घेत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड, मुंबई येथे जोरदार आंदोलन केलं. शिवसेना शिंदे गटाचे मुलुंड विभागप्रमुख जगदीश शेट्टी यांनी आज संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त निषेध व्यक्त केला आहे. संजय राऊत असेच बोलत राहिले, तर आणखी तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.