महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्युरेटिव्ह पिटीशन मराठा समाजासाठी एक आशेचा किरण, शिंदे गटाची प्रतिक्रिया - Shinde Group On Curative Petition

Shinde Group On Curative Petition: एसईबीसी मराठा आरक्षण रद्द करण्याच्या (SEBC Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटीशन शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर २४ जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होणार आहे. (Maratha Reservation Issue)

Shinde Group On Curative Petition
मराठा आरक्षण

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 11:01 PM IST

मुंबईShinde Group On Curative Petition:आता ही पिटीशन न्यायालयाने स्विकारली असून, यावर मराठा समाज कसा मागास आहे, हे दाखवण्याची संधी आहे. तसेच एसईबीसी पुनर्स्थापित झाल्यास मराठा आरक्षण प्रश्न सुटून सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील, असं शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते संजीव भोर-पाटील यांनी म्हटले आहे. (Sanjeev Bhor Patil)

नामवंत विधिज्ञांची फौज उभी:राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी नामवंत विधिज्ञांची फौज उभी करण्यात आलेली आहे. यापूर्वी मविआ सरकार काळात मराठा समाजाच्या बाजूने सत्य माहिती, तथ्ये, तपशील न्यायालयासमोर मांडला गेला नाही. तो या पिटीशनच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकरणी ओपन कोर्ट हिअरिंग व्हावं, अशी आग्रही विनंती सरकारकडून न्यायालयाला करण्यात आली आहे. संजीव भोर-पाटील पुढे म्हणाले की, नुकताच एमपीएससीच्या SEBC to EWS उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्तीचा अतिशय अवघड असलेला मुंबई उच्च न्यायालयातील लढा राज्य सरकारने जिंकला आहे.


आम्ही आशावादी:पुढे बोलताना संजीव भोर-पाटील म्हणाले की, अर्थात क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये न्याय मिळविणे ही दुर्मिळ संधी असून मराठा समाजाच्या बाजूने चांगले मेरिट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार तसेच मराठा समाजबांधव याबाबतीत पूर्ण आशावादी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकारात्मकता, प्रामाणिकता तसेच प्रत्येक विषय गांभीर्याने आणि पूर्ण क्षमतेने हाताळण्याची त्यांची हातोटी कामाला आली. यामुळे एमपीएससीच्या थेट जवळपास ५०० आणि इतर साडेतीन ते चार हजार उमेदवारांना नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशीच लढाई क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातही करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आहे.

हेही वाचा:

  1. 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
  2. माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह
  3. मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण शक्तीनिशी काम करत आहे, जरांगे पाटलांना समजावले जाईल - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details