मुंबई : आदित्य ठाकरे यांनी अव्हान दिल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी ठाकरेंनी माझ्या विरोधातच निवडणुक जिंकुण दाखवावी असे आव्हान दिले आहे.
आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अव्हान : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मी या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल आणि त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांनी वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते.
देसाईचे आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर :त्यावर शिंदे गटाचे नेते शंभूरज देसाईनी प्रतिहल्ला केला होता. हिंमत असेल तर पाटणमधून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शंभूराज देसाईंनी आमदार आदित्य ठाकरेंना काल दिले आहे. आदित्य ठाकरेंनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्र्यांना वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी पाटण विधानसभा मतदार संघात येऊन निवडून येऊन दाखवा, असे प्रति आव्हान शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.