महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Politics: अनुराग ठाकूर यांचा ६ महिन्यात दुसरा मुंबई दौरा; शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता - अनुराग ठाकूर यांचा ६ महिन्यात दुसरा मुंबई दौरा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. दक्षिण मध्य मुंबई व कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत आहेत. सोमवारी त्यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ६ महिन्याच्या अंतरात अनुराग ठाकूर हे दुसऱ्यांदा शिंदे गटाकडे असलेल्या मतदार संघाचा आढावा घेत असल्याने शिंदे गटासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

Maharashtra Politics
प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर , केंद्रीय मंत्री

By

Published : Feb 14, 2023, 8:57 AM IST

प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर , केंद्रीय मंत्री

मुंबई :केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर येऊन दक्षिण मध्य मुंबई व कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन गेले होते. त्यानंतर पुन्हा २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचा आढावा त्याचबरोबर ६ विधानसभा क्षेत्रांशी संबंधित बैठकसुद्धा त्यांनी घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे सुंदर बजेट जनतेला दिले आहे, याचा पाढा वाचून दाखवला.


शिंदे-फडवणीस सरकारमध्ये योग्य तालमेल :अमृत काळातील हे पहिले बजेट आहे. विकसित भारताची वाटचाल या बजेटमधून झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात शिंदे - फडवणीस सरकारमध्ये योग्य तो तालमेल असून हे सरकार खूप छान काम करत आहे, हे सांगायला सुद्धा ते विसरले नाही. याप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांच्यावर निशाणा साधला. माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चॅलेंज देत असून ते स्वीकारण्यास आमचा कार्यकर्तासुद्धा तयार असेल असे सांगत, आमचा एखादा कार्यकर्ता ही त्यांना हरवू शकतो असेही ते म्हणाले. जी व्यक्ती आपला पक्ष टिकवू शकली नाही त्यांच्याविषयी काय बोलायचे? असा टोलाही त्यांनी ठाकरे परिवाराला लगावला.


६ महिन्यात दुसरा दौरा :मागच्याच वर्षी मुंबईत येऊन आढावा घेऊन गेलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा एकदा ६ महिन्याच्या अंतरात दुसऱ्यांदा दक्षिण मध्य मुंबई व कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. हे दोन्ही लोकसभा मतदार शिंदे गटाकडे असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे राहुल शेवाळे आहेत. तर कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत. अशा परिस्थतीमध्ये शिंदे गटाकडे असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा आढावा भाजपकडून वारंवार का घेतला जात आहे. असा प्रश्न शिंदे गटाच्या नेते व कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यावर या मतदार संघाचा आढावा घेण्याचे काय काम? असा प्रश्न अनुराग ठाकूर यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, मागच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपसुद्धा गठबंधनमध्ये होती. यामध्ये सहयोगी दलसुद्धा सहयोग करेल. भाजप आपली ताकत आजमावत आहे. संघटन मजबूत करण्याचे काम आम्ही करत आहोत. लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेंअंतर्गत ते या दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. देश त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे साधन आहे. असे सांगत त्यांनी हे दोन्ही मतदार संघ शिंदे गटाकडेच राहतील, असे कुठेही सांगितले नाही.



कल्याण लोकसभा मतदार संघात कोण ?कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा ते इथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असे असतानाच डॉ. शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रित करत शत-प्रतिषतचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. ठाकूर यांच्या दक्षिण मध्य मुंबई व कल्याण लोकसभा दौऱ्यामुळे या दोन्ही जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना कल्याण मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या त्या जागा पूर्ण बळकट करण्याचे प्रयत्न आहेत.

हेही वाचा : Hearing On Shiv Sena : शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details