सुरज चव्हाण, संजय भोर यांची प्रतिक्रिया मुंबई Shinde Group Criticizes Sanjay Raut :डेंग्यूमधून बरं झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राऊत महाराष्ट्राचे बोलके हिरो :राजकीय मतभेद असले, तरी सर्व राजकीय पक्ष मतभेद विसरून राज्याच्या हितासाठी एकत्र येतात. तसंच एखादा राजकीय नेता आजारी असेल, तर त्याच्या आजाराविषयी बोलू नये, अशी महाराष्ट्रातील परंपरा आहे. पण महाराष्ट्राचे बोलके हिरो, उडाणटप्पू अशी ओळख असलेल्या संजय राऊतांनी अजित पवारांच्या आजारपणावर टीका करणं योग्य नाही. त्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नसल्याची टीका अजित पवार गटाचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी केलीय.
जीभेवर ताबा ठेवा : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना अजित पवार यांनी ठाकरेंना सांभाळलं. त्यांना केलेली मदत अख्या महाराष्ट्रानं पाहिली. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचे किस्से आम्हाला देखील माहीत आहेत. ते बोलायला लावू नये, असा थेट इशारा सुरज चव्हाण यांनी संजय राऊत यांना दिला आहे. आपलं राज्य संस्कारी राज्य म्हणून ओळखलं जातं. ती ओळख पुसण्याचं काम आपल्याकडून होऊ नये, आपण आपल्या जीभेवर ताबा ठेवावा, अशी टीका देखील चव्हाण यांनी राऊतांवर केलीय.
संजय राऊत विकृती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर टीका करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या संसर्गामुळं आजारी होते. त्यातून सावरल्यानंतर त्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एखाद्या राजकीय नेत्यानं आजारपणामुळं सक्तीची विश्रांती घेतली असेल, तर त्यांच्यावर टीका करण्याचं कारण नाही. पण या महाराष्ट्रात संजय राऊत सारखा विकृत माणूस आहे. ज्याला प्रत्येक गोष्टीत व्यंग दिसतं असं टीकास्त्र शिंदे गटाचे प्रवक्ते संजय भोर पाटील यांनी सोडलंय.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray Mumbra Visit : दम असेल तर समोर या; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान
- Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक
- Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ