मुंबई - शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं ? याचा वाद सुप्रीम कोर्टाकडून आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना असेल किंवा शिंदे गट असेल या दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते जोडण्याचं पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कार्यकर्त्यांचा सोबतच विविध पक्षांचे पदाधिकारी देखील फोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Sandeep Deshpande allegation on Shinde government ) करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे येण्यासाठी विविध आमिष दाखवले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी केला आहे.
स्वतःचा गट वाढवण्यासाठी कार्यकर्ते का फोडता? - यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, " माध्यमातून ही जी काही माहिती आहे ती खरी आहे. अशा प्रकारच्या घटना भायखळ्यासारख्या परिसरामध्ये असतील की मुंबई इतरत्र असतील होत आहेत. आमच्या मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून आमिष्य दाखवली जात ( Shinde group Baited to MNS officials ) आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांना विविध पदांची लालूच दिले जात आहे. संजय गटाचे लोक आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत. तुम्ही जी काही लोक बाहेर पडलेत तुमचा जो काही गट आहे त्याला आणखी मोठ करण्यासाठी तुम्ही इतर पक्षातील पदाधिकारी का फोडता?" असा सवाल आता मनसे कडून उपस्थित केला जात आहे.