महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shinde Govt Decision : शासकीय पत्रांवर 'जनहिताय सर्वदा' बोधचिन्ह, घोषवाक्य मुद्रित करण्याचा सरकारचा निर्णय - शिंदे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा धडाका शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केला होता. (Shinde Govt Decision) आता सहा महिन्यानंतर महाविकास आघाडीचा शासकीय पत्रांवर 'जनहिताय सर्वदा' हे बोधचिन्ह (emblem Janhitaya Sarvada on govt papers) आणि घोषवाक्य मुद्रित (print slogan on govt papers) करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या चिन्हांचे आज अनावरण करण्यात आले. (Latest news from Mumbai)

Shinde Govt Decision
'जनहिताय सर्वदा' बोधचिन्हाचे अनावरण

By

Published : Jan 10, 2023, 8:27 PM IST

मुंबई :स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, कंपन्या व सहकारी संस्था यांना पत्रव्यवहार करताना "महाराष्ट्र शासन" असा उल्लेख केला जातो. (Shinde Govt Decision) महाविकास आघाडीने यावर निर्बंध आणले होते. नवे घोषवाक्य आणि बोधवाक्य छापण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मंत्रालयीन विभागांनी कोणतेही बोध चिन्हे व घोषवाक्‍य वापरू नये, असे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला तसे आदेश दिले होते. त्यानुसार, विविध सेवांच्या अनुषंगाने जनतेशी संपर्क असणाऱ्या मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखाली राज्य शासकीय कार्यालयाचे 'जनहिताय सर्वदा' हे स्वतंत्र बोधचिन्ह, (emblem Janhitaya Sarvada on govt papers) घोषवाक्‍य (print slogan on govt papers) तयार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चिन्हांचे अनावरण करण्यात आले. (Latest news from Mumbai)


बोधचिन्ह ​प्रशासनाच्या परंपरेस साजेसे ​:मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण पार पडले. मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. त्यामुळे मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details