मुंबई : राजकारणात एकमेकाचा विरोध होत असतो. वरचढ होऊ नये म्हणून अनेक मार्गाने अडथळा आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र उलट आहे. येथे विरोधक नव्हे तर कधी चक्क शासकीय विमान आणि हवामान खोडा घालत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात सलग दुसऱ्यांदा खराब विमान आणि हवामनामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रवास रखडला आहे. आज तर जळगाव दौरा हवामान खराब झाल्याने विमानच उतरले नाही त्यामुळे रद्द करावा लागला आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा : जळगावच्या जामनेरमधील गोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाने महाकुंभ अभियान आयोजित केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर दौऱ्यावर येणार होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बंजारा समाजाच्या संताच्या मंदिराचे उद्घाटनही केले जाणार होते. मात्र खराब हवामान असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले.
शिंदे, फडणवीस या दौऱ्याला जाणार का : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे शासकीय विमानाने जामनेरला निघाले. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर हे विमान परत आणण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मोठा खोळंबा झाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कालिना एअरपोर्टच्या गेट क्रमांक सहावरून वर्षा निवासस्थानी निघाले. त्यामुळे शिंदे, फडणवीस या दौऱ्याला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.