महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ministry Expansion : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह खाते वाटप होणार आठवडाभरात, काही विद्यमान मंत्र्यांना मिळणार डच्चू ? - खाते वाटप होणार आठवड्याभरात

आगामी आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Ministry Expansion Will Be Next Week
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 9, 2023, 11:06 PM IST

Updated : Jul 10, 2023, 6:50 AM IST

मुंबई :अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अशी नाराज आमदारांकडून मागणी करण्यात येत आहे. भाजपसहित शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी उघडपणे समोर येताना दिसून येत आहे. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व खाते वाटप होण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजपसहित शिंदे गटाच्या काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे या मंत्र्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे.

अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाने गोंधळ :वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार सूत्रांच्या माहितीनुसार आठवड्याभरामध्ये उरकला जाणार आहे. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यावरून वर्षभरापासून मंत्रीपदासाठी ताटकळत बसलेले शिंदे गटाचे व भाजपचे आमदार प्रचंड नाराज आहेत. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून भाजप व शिंदे गटातील काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याचे संकेत आहेत. या कारणास्तव या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी असून अजित पवार यांना सत्तेत घेतल्याने या सर्व घडामोडी होत असल्याचे खापर शिंदे तसेच भाजप आमदारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे.

विद्यमान मंत्र्यांना डच्चू :शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे अशी मागणी भाजपच्या वरिष्ठांकडून केली जात आहे. मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री तानाजी सावंत तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत एकाही मंत्राला मंत्रिमंडळातून सध्याच्या परिस्थितीत काढले जाऊ नये अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपच्याही विद्यमान एक ते दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यावर विचार केला जात आहे.

बबनराव लोणीकर यांचा समावेश : जालन्यामधील भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची चर्चा जोरात आहे. मराठवाड्यामध्ये शिंदे गटाला तीन मंत्रिपदे दिली आहेत. त्यामध्ये मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री तानाजी सावंत यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाकडून मागच्या रविवारी घेण्यात आलेल्या शपथविधीमध्ये मराठवाड्यातून धनंजय मुंडे व संजय बनसोड यांनाही मंत्रीपद दिली आहेत. मराठवाड्यामध्ये भाजपकडे 16 आमदार असताना पक्षाचा फक्त एकच मंत्री असल्याने येथून आमदार बबनराव लोणीकर यांची मंत्री पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार :राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रात भाजपबरोबर आलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट यांनाही प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे नावही चर्चेत आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.

हेही वाचा-

  1. Ashish Jaiswal On Ministership : आमदार आशिष जयस्वाल मंत्रिपदाच्या शर्यतीत; म्हणाले, माझा नंबर यावेळेस...
  2. NCP Politics Crisis: छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाने भाजप आमदारांचे मंत्रीपद हुकणार? राजकीय विश्लेषक म्हणतात...
  3. Monsoon Session 2023 : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून, मंत्रिमंडळ विस्तार गुलदस्त्यात
Last Updated : Jul 10, 2023, 6:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details