मुंबई : सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर ( Afzal Khans grave ) परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाईचे भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane On Afzal Khans grave ) यांनी स्वागत करण्यात आले आहे. शिंदे - फडणवीस सरकार हे खरे हिंदू विचारांचे सरकार असल्याचे म्हटले ( Shinde Fadnavis Hindu thought government ) जाते.
शिंदे - फडणवीस सरकार खरे हिंदू विचारांचे सरकार - नितेश राणे - शिंदे फडणवीस हिंदू विचारांचे सरकार
सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर ( Afzal Khans grave ) परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाईचे भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane On Afzal Khans grave ) यांनी स्वागत करण्यात आले आहे. शिंदे - फडणवीस सरकार हे खरे हिंदू विचारांचे सरकार असल्याचे म्हटले ( Shinde Fadnavis Hindu thought government ) जाते.
काय म्हणाले नितेश राणे? : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आज शिवप्रताप दिन ( Shiv Pratap Day ) आहे. तसेच अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी होती की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची जी कबर आहे, त्याच्या अवतीभोवती जे अतिक्रमण करण्यात आले आहे ते हटवण्यात यावे. आणि असा निर्णय यापूर्वी माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दिला होता पण कुठलेच सरकार त्यावर अंमलबजावणी करताना दिसत नव्हते. परंतू आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. त्यांनी हा एतिहासिक निर्णय घेतलेला आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे व पूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ज्या पद्धतीने अफजल खानच्या कबरीपाशी असलेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले जात आहे, तसेच इतर अनेक ठिकाणी झालेले अनधिकृत अतिक्रमणही हटविले जावेत अशी अपेक्षा ही नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
इतिहास काय? :१० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा सरदार अफजलखान याला मारले होते. त्याचबरोबर त्याचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचेही मुंडके छाटले होते. या विजयाचे प्रतीक म्हणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर येथे बांधली होती. परंतु गेल्या काही वर्षात या कबरीभोवती बांधकामे वाढली होती आणि त्याचे उदात्तीकरण ही होत होते. मात्र, आजच्या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. काही शिवप्रेमींनी म्हटले आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल. शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे.