नवी मुंबई शिंदे फडणवीस सरकार Shinde Fadnavis government आणि पोलिसी दंडुकेशाही विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा Strike march on Police Commissionerate काढला. सदर मोर्चाला सकाळी 11 च्या दरम्यान सीबीडी बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानात मेळाव्याच्या स्वरूपात सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा जुने पालिका मुख्यालय मार्गाने पोलीस आयुक्तालयावर गेला. पोलीस आयुक्तांना निवेदन देत या मोर्चाची सांगता झाली. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, नेते भास्कर जाधव, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाणे नवी मुंबईतील अनेक सेना पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, तडीपारी करणे, शिंदे गटात प्रवेशासाठी दबाव टाकणे, खंडणी मागणे अशा पोलिसांच्या गैरकारभार विरोधात सदर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती सेना नेत्यांनी दिली आहे.
शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आमच्यावर पोलिसी दबाव बनवला जात आहे. हा आमचा पहिला धडक मोर्चा असून असे अनेक मोर्चे ठिकठिकाणी निघणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. यावेळी नितेश राणेंवर सडकून टीका करताना भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करता, मग त्या दिवट्याने अकेलेचे तारे तोडले आहेत. त्याच्यावर काहीच का होत नाही, असा सवाल देखील राऊत यांनी उपास्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस ठाण्यामध्ये गोळीबार करतात. एक आमदार हातपाय तोडण्याची भाषा करतो, त्यांना काहीच होत नाही. आमच्या निर्दोष शिवसैनिकांवर नाहक गुन्हे दाखल केले जातात. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले असल्याचे राऊत म्हणाले.
अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते शिंदे फडणवीस सरकार सूडबुद्धीने, बदलाच्या भावनेने काम करत आहे. पोलिसांना हाताशी धरून शिवसैनिकांवर राज्यभरात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शिंदे सरकारला सत्तेचा माज आहे, हा माज जनतेच्या मदतीने शिवसैनिक उतरवल्या शिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे जगभरात नाव आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा मलीन करू नये, असे देखील दानवे म्हणाले. या प्रकरणी नागपूर अधिवेशनात आपण आवाज उठवणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.