महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sheena Bora Murder Case : बहुचर्चित शीना बोरा हत्येचे गूढ वाढले; शीना जिवंत असल्याचा संशय

बहुचर्चित शीना बोरा तथाकथित हत्येचं गूढ (Sheena Bora murder mystery) वाढत आहे. या प्रकरणात साक्षीदार राहुल मुखर्जीच्या (Witness Rahul Mukherjee), आजच्या उलटतपासणीत अनेक धक्कादायक पुरावे इंद्राणीच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आले. 24 एप्रिल 2012 ला शीनाची हत्या (Sheena Bora Murder Case) झाल्याचे, पोलीस रेकॉर्डमध्ये नमूद आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

Sheena Bora Murder Case
शीना बोरा तथाकथित हत्येचे गूढ

By

Published : Nov 15, 2022, 10:50 PM IST

Updated : Nov 15, 2022, 10:58 PM IST

मुंबई :बहुचर्चित शीना बोरा तथाकथित हत्येचं गूढ (Sheena Bora murder mystery) वाढत आहे. या प्रकरणात साक्षीदार राहुल मुखर्जीच्या (Witness Rahul Mukherjee), आजच्या उलटतपासणीत अनेक धक्कादायक पुरावे इंद्राणीच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आले. 24 एप्रिल 2012 ला शीनाची हत्या (Sheena Bora Murder Case) झाल्याचे, पोलीस रेकॉर्डमध्ये नमूद आहे. मात्र 19 जून 2012 मध्ये राहुल मुखर्जीचा,शीना बोराला ईमेलचा खुलासा झाला. यामध्ये शिनाच्या बँक खात्यात (money deposit in Sheena bank account) पैसे डिपॉझिट केले असल्याचा राहुलने मेल केला होता. latest news from Mumbai, Mumbai Crime

राहुलने शीनाच्या बॅंक खात्यात केले पैसे जमा-शीना गायब झाल्यानंतर आयसीआयसीआय बँक खात्यात तब्बल 7 महिने राहुलने पैसे जमा केल्याचे उघड झाले आहे. इंद्राणी मुखर्जीचे वकील एड. रणजीत सांगळे यांनी कोर्टात पुरावे सादर केले. ईमेल आणि बँकेत पैसे जमा केल्याचे राहुल मुखर्जीने साक्षय दरम्यान केले असल्याचे मान्य केले. राहुल मुखर्जीच्या सुनावणीत यापूर्वीही अनेक धक्कादायक खुलासे झालेत. या प्रकरणी 17 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

शीना बोराच्या हत्येचे गूढ वाढतीवर-बहुचर्चित शीना बोरा तथाकथित हत्येचे गूढ वाढत आहे. या प्रकरणात साक्षीदार राहुल मुखर्जीच्या, आजच्या उलटतपासणीत अनेक धक्कादायक पुरावे, इंद्राणीच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आले.

शीना जिवंत असल्याचा संशय-मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणांमध्ये प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जीची उलट तपासणी आज इंद्राणी मुखर्जीच्या वकील रणजीत सांगळे यांच्यावतीने घेण्यात आली. उलट तपासणीत पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा राहुल मुखर्जी यांच्या संदर्भात करण्यात आला आहे. शीना बोराच्या मृत्यूनंतर सात महिन्याने शीनाच्या बँक खात्यामध्ये राहुलने रक्कम जमा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शीना बोरा जिवंत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उलटतपासणीत अनेक धक्कादायक पुरावे -या प्रकरणात साक्षीदार राहुल मुखर्जीच्या आजच्या उलटतपासणीत अनेक धक्कादायक पुरावे इंद्राणीच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आले आहे. 24 एप्रिल 2012 ला शीनाची हत्या झाल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे. मात्र 19 जून 2012 मध्ये राहुल मुखर्जीचा शीना बोराला ईमेल केला होता. तसेच शीनाच्या बँक खात्यात राहुलने पैसे डिपॉझिट केले होते.राहुल मुखर्जी ने शीना बोरा च्या आयसीआयसीआय बँक खात्यात शीना गायब झाल्यानंतर तब्बल 7 महिने राहुलनं पैसे जमा केल्याचं उघड केले आहेत. इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी यासंदर्भात कोर्टात पुरावे सादर केले आहे. सदर ईमेल आणी बँकेत पैसे जमा केल्याचं राहुल मुखर्जीनं कोर्टासमोर साक्ष दरम्यान मान्य केले आहे. राहुल मुखर्जीच्या सुनावणीत यापूर्वी ही अनेक धक्कादायक खुलासे केले होते आता या प्रकरणी 17 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण? -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

Last Updated : Nov 15, 2022, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details