महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठरलं..! शिवाजी पार्कच्या नामविस्तारास मंजुरी..  आता 'या' नावाने ओळखले जाईल मैदान - स्थायी समिती अध्यक्ष मुंबई

दादर येथे शिवाजी पार्क मैदान 1925 मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1966 मध्ये उभारण्यात आला. या मैदानावर राज्य सरकारचे अनेक शासकीय कार्यक्रम होतात.

shavaji-park-name-change-to-chatrapati-shivaji-maharaj-park-in-mumbai
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

By

Published : Mar 11, 2020, 7:12 PM IST

मुंबई- शहरातील दादर येथील शिवाजी पार्क हे सुप्रसिद्ध असे मैदान आहे. सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांचे हे आवडीचे मैदान आहे. या मैदानाला 'शिवाजी पार्क' म्हणून संबोधले जायचे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात असल्याने या मैदानाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे केले जावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. या मागणीला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आता या मैदानाला 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे संबोधले जाणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

हेही वाचा-'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'

दादर येथील शिवाजी पार्क हे मैदान 1925 मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1966 मध्ये उभारण्यात आला. या मैदानावर राज्य सरकारचे अनेक शासकीय कार्यक्रम होतात. अशा या मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात 10 मे 1927 ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर या मैदानाला आतापर्यंत शिवाजी पार्क या नावानेच संबोधले जात होते. मात्र, या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याने हा प्रस्ताव आज सभागृहात पुन्हा मांडून त्याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा करावा, अशी उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली.

या उपसूचनेला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे या मैदानाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे करण्याला पालिका सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली. आता हे मैदान 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नावाने ओळखले जाणार आहे.

दसरा मेळावा अन् शिवाजी पार्क-

शिवाजी पार्क या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सलग 40 वर्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले आहे. राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारचा शपथविधीही या मैदानावर झाला. याच मैदानात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संदीप पाटील, किरण मोरे आदी क्रिकेटच्या खेळाडूंनी सराव करुन क्रिकेट विश्वात भारताच्या नावाचा लौकिक केला. या मैदानावर राजकीय सभा घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि नेते प्रयत्नशील असतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेनावाले 'शिवतीर्थ' म्हणतात. शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details