मुंबई -'राष्ट्रपती पदक' पुरस्कारासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती पुरवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे मुंबई अग्निशामक दलप्रमुख शशिकांत काळे यांना आज पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रभारी अग्निशामक दल प्रमुख म्हणून कैलाश हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अग्निशामक दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांना अखेर पदावरून हटवले - मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख बातमी
अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशामक दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांना उपायुक्त पदी बढती मिळाल्याने ऑगस्ट २०२० मध्ये शशिकांत काळे यांच्यावर अग्निशामक दलाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हे प्रकरण शेकले -
अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशामक दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांना उपायुक्त पदी बढती मिळाल्याने ऑगस्ट २०२०मध्ये शशिकांत काळे यांच्यावर अग्निशामक दलाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुंबई अग्निशामक दलाच्या अधिकारी जवानांची नावे राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवण्यात येतात. त्यात काळे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे काळे यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे त्यांची सह आयुक्त सामान्य (प्रशासन) मिलीन सावंत यांच्यामार्फत खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे काळे यांची खात्यांतर्गत चौकशी होईपर्यंत त्यांना अग्निशामक दल प्रमुख पदावरून हटवण्यात आले असून त्यांचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत.
मॉलच्या आगी -
सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर मुंबईतील इतर मॉलची तपासणी करताना 29 मॉलमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. या मॉलला नोटीस न देता ते बंद का करण्यात आले नाहीत. या मॉलमध्ये आग लागल्यास अग्निशामक अधिकाऱ्याना जबाबदार धरा, आगीच्या घटना घडल्यास अग्निशामक अधिकाऱ्यांना जबाबदार धरून सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याकडून करण्यात आली आहे.
हिवराळे यांची नियुक्ती -
मुंबई अग्निशामक दल प्रमुखपदी नियुक्ती झालेले कैलाश हिवराळे हे गेली ३२ वर्ष ते अग्निशामक दलात कार्यरत आहेत. हिवराळे हे परिमंडळ-२ चे उपप्रमुख अग्निशामक अधिकारी आहेत. हा पदभार सांभाळून प्रभारी प्रमुख अग्निशामक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.