महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणीने बांधले 'शिवबंधन' - shrmila yewale

भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्मिला येवेलेंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हातात बांधले.

शर्मिला येवेलेंचा शिवसेनेत प्रवेश

By

Published : Oct 3, 2019, 10:40 AM IST

मुंबई - भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्मिला येवेलेंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले.

अहमदनगरमध्ये भाजपची महाजनादेश यात्रा आली होती, त्यावेळी शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक केली होती. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे कुटुंब उपस्थित राहणार

हेही वाचा - दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?

मनसेच्या नितीन नांदगावकर यांनीही बांधले 'शिवबंधन'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनीही अखेर शिवबंधन बांधले. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. मनसेचे आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते.

ABOUT THE AUTHOR

...view details