मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या उद्या बुधवारपासून दोन दिवस पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. शर्मिला ठाकरे या बुधवारी सकाळी 9 ला पुराचा तडाखा बसलेल्या कराड व त्यानंतर 11 वाजता सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला प्रथम भेट देतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता त्या सांगलीतल्या ग्रेट मराठा हॉटेलमध्ये जाणार आहेत. तसेच दुपारी 2 वाजता सांगलीतील लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करतील.
शर्मिला ठाकरे करणार पूरग्रस्त भागांचा दौरा
शर्मिला ठाकरे या बुधवारी सकाळी 9 ला पुराचा तडाखा बसलेल्या कराड व त्यानंतर 11 वाजता सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला प्रथम भेट देतील. तसेच दुपारी 2 वाजता सांगलीतील लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करतील.
संध्याकाळी 4 वाजता मिरज शहरात कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन जनावरांच्या छावणीस भेट देणार आहेत. त्यानंतर 5 वाजता त्या कोल्हापूरला रवाना होतील. कोल्हापूरमध्ये पुराचा फटका बसलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजी येथील पूरबाधित नागरिकांची संध्याकाळी 6 वाजता भेट घेणार आहेत.
कोल्हापूर येथे पुराची पाहणी करून झाल्यानंतर त्या साताऱ्याकडे मार्गस्थ होणार आहेत. साताऱ्यात पोहोचल्यानंतर तिथेही त्या पूरग्रस्त लोकांची भेट घेणार आहेत. याआधीच मनसेचे काही नेते मंडळी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यास पोहचले आहेत.