मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने बजावलेल्या नोटिसनंतर आज शर्मिला राज ठाकरे यांनी मौन सोडले. ईडीच्या नोटीसला माझा नवरा घाबरणार नाही, अशा नोटीस येतच असतात, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.
'ईडी'च्या चौकशीला माझा नवरा घाबरणार नाही - शर्मिला ठाकरे - sharmila thakre
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने बजावलेल्या नोटिसनंतर आज शर्मिला राज ठाकरे यांनी मौन सोडले. ईडीच्या नोटीसला माझा नवरा घाबरणार नाही, अशा नोटीस येतच असतात, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.
आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे, ही दबावतंत्राची टेक्निक आहे, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या. ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. आम्हाला दबावात ठेवण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचे शर्मिला म्हणाल्या.
दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली. येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. भाजपचे दबाव तंत्र असल्याचं आरोप मनसेच्या नेत्यांनी केला आहे.