महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी

Share Market Update : आठवड्याच्या पहिल्या दिवशी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी मोठ्या उसळीनं सुरुवात केली. सुरुवातीच्या अवघ्या 15 मिनिटांत 4 लाख कोटी रुपयांची भर पडली. भाजपच्या विजयासह सेन्सेक्सनं प्रथमच 68,000 चा टप्पा पार केला.

Share Market Update
Share Market Update

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 12:16 PM IST

मुंबई Share Market Update :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात प्रचंड उत्साह दिसून आलाय. बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडलंय. BSE वर, सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांच्या वाढीसह 67,273.40 वर उघडलाय. त्याच वेळी, NSE निफ्टी 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 20,554.00 अंकांवर उघडला. यामुळं गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

निर्देशांकांनी गाठला नवीन उच्चांक : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) निर्णायक विजयामुळं सोमवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला. BSE सेन्सेक्स 900 अंकांनी वधारुन 68,384 च्या नवीन उच्चांकावर तर NSE निफ्टी 280 अंकांनी झेप घेऊन 20,550 वर पोहोचला. एसबीआय, एल अँड टी, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स सेन्सेक्सवर 2 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्याच वेळी अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सनं निफ्टीला 8 टक्क्यांपर्यंत वाढ दिलीय.

निफ्टी बँकमध्ये 1 टक्क्यांची वाढ : केवळ ब्रिटानियाचा हिस्सा 0.11 टक्क्यांनी घसरला आहे. बीएसईवरील ब्रॉडर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे 1 टक्क्यांची उसळी दिसून आलीय. क्षेत्रांमध्ये, NSE वरील PSU बँक निर्देशांक 2.6 टक्क्यांच्या वाढीसह चार्टच्या शीर्षस्थानी व्यवहार करत आहे. त्याच वेळी निफ्टी बँक, ऑटो आणि मेटल पॉकेटमध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. अदानी शेअर्सही 14 टक्क्यांनी वधारले. अदानी एनर्जी सोल्युशन्स 14 टक्क्यांनी वाढले, तर अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी 12 टक्क्यांहून अधिक वाढले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर 6-8 टक्क्यांनी वधारले आहेत.

शेअर बाजारात तेजी : शेअर बाजारात आज तेजी आहे. या वाढीमागं भाजपाची राज्यातील निवडणुकीत अपेक्षेपेक्षा मजबूत कामगिरी आहे. मजबूत देशांतर्गत स्थूल आर्थिक डेटा आणि प्रमुख राज्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) विजयामुळं सोमवारी देशांतर्गत बेंचमार्क इक्विटी निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडलंय.

हेही वाचा :

  1. BSE Sensex Today: मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला विक्रमी निर्देशांक, शेअर बाजारात तेजीची लाट
  2. Share Market Opening : मुंबई शेअर बाजार 4 दिवसांच्या पडझडीनंतर आज तेजीत; काय आहे सध्याची स्थिती, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details