महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून होणार साजरा - Sharad Pawar's birthday

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून शेतकर्‍यांपर्यंत निधी पोचवण्यात येणार असून राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे.अशाप्रकारचा वर्षभर हा कार्यक्रम होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. १२ डिसेंबर  रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Dec 10, 2019, 2:58 PM IST

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना १२ डिसेंबर रोजी ८० वर्षे पूर्ण होणार असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी हा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून साजरा करणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून बळीराजा कृतज्ञता कोष तयार करुन ८० लाखाचा कोष सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा-कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण

जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यात येणार असून राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे. अशाप्रकारचा वर्षभर हा कार्यक्रम होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा शरद पवार स्वीकारणार आहेत. यावेळी पुष्पगुच्छ, पुष्पहारांचा स्विकार केला जाणार नाही. तो निधी कृतज्ञता कोषात जमा करावा. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम देण्यात आला आहे. युवकाच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विकास आणि परिवर्तनाचा महानेता या विषयावर घेतली जाणार आहे. शिवाय संपुर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्यावतीने ११ ते २० डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details