मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत क्षेत्रातील काही समस्या व कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात माहिती दिली आहे.
शरद पवारांचे उद्धव ठाकरेंना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या सूचना - corona news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत क्षेत्रातील काही समस्या व कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात माहिती दिली आहे.
शरद पवारांनी केलेल्या सूचनांमध्ये शेती उद्योग संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोरोनामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भात अडचणी येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीना पत्र लिहले आहे. तसेच राज्य सरकारने तातडीने उपाययोजन कराव्यात, असे म्हटले आहे. तसेच सध्याच्या कृषी कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणीही पवारांनी केली आहे. तसेच लघुउद्योजक व्यावसायिक यांच्यावर संकट आले आहे त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पवारांनी केली आहे. आरोग्यविषयक समस्या सोडविणे, तमाशा कलावंतावरील आर्थिक संकट, भारत व भारताबाहेर अडकलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी या पत्राद्वारे मांडल्या आहेत. तसेच काही सूचनाही केल्या आहेत.
या उपाययोजनांचा शासकीय स्तरावरून विचार होऊन जनतेला दिलासा मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो, असे पवारांनी म्हटले आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रणी राज्य असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा ओघ अधिक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना विषाणूबाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगल्या उपाययोजना करण्याचे काम करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.