महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज दिल्लीमध्ये पवार-गांधी भेट, सत्तास्थापनेबाबत चर्चा - महाशिवआघाडी

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होणार आहे.

संपादीत छायाचित्र

By

Published : Nov 18, 2019, 7:28 AM IST

मुंबई- राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होणार आहे.


राष्ट्रपती राजवटीनंतर सेना-भाजपची युती संपुष्टात आली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाशिवआघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पवार आणि गांधी यांच्यात चर्चा होणार आहे. त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मंगळवारी महाशिवआघाडीबाबात निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र सेनेला दिले नाही. त्यामुळे सेनेनंतर राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, सेनेसह राष्ट्रवादीही बहुमत सिद्ध करू शकली नाही. आज होणाऱ्या पवार आणि गांधी भेटीनंतर राज्याच्या राजकाणाला कोणते वळण मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details