मुंबई - निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ मिळताच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंजाबच्या कृषी दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी वाघा बॉर्डरला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर नातू रोहीत पवार, दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव देशमुख हेही होते.
शरद पवारांनी नातू रोहीतसह दिली वाघा बॉर्डरला भेट - meet
निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ मिळताच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंजाबच्या कृषी दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी वाघा बॉर्डरला भेट दिली.
वेळात वेळ काढून शरद पवार यांनी वाघा बॉर्डरवरील सायंकाळच्या समारंभाला हजेरी लावली. यावेळी त्यांना वाघा-अटारी बॉर्डरवरची परेड पाहण्याचा योग आला. याबाबतची माहिती खुद्द रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी शरद पवारांनी ते संरक्षणमंत्री असताना आलेले अनुभव, राष्ट्रीय सुरक्षेच महत्व या गोष्टींबद्दल उत्साहाने सांगितले.
कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पंजाबमध्येही होतात. त्या प्रयोगांची पाहणी करण्यासाठी शरद पवार, त्यांचे नातू रोहित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख पंजाब दौऱ्यावर गेले होते.