महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातव यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त - शरद पवार

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

sharad pawar supriya sule ajit pawar reaction on rajiv satav death
शरद पवार

By

Published : May 16, 2021, 11:47 AM IST

मुंबई- काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले, काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया -

सुप्रिया सुळे यांनीही राजीव सातव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया -

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details