मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र सायंकाळी ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या (Breach Candy Hospital) डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अजून एक ते दोन दिवसाचे उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील 4 आणि 5 नोव्हेंबरच्या शिबिराला उपस्थित राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
Sharad Pawar: शरद पवारांना अद्यापही रुग्णालयातून डिस्चार्ज नाही - ब्रिज कँडी हॉस्पिटल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र सायंकाळी ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या (Breach Candy Hospital) डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अजून एक ते दोन दिवसाचे उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
2 नोव्हेंबरलाच मिळणार होता डिस्चार्ज: शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवार यांच्यावर 2 नोव्हेंबर पर्यंत उपचार केले जाणार असून त्यांना 2 नोव्हेंबरलाच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली होती. मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अजून दोन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र असे असले तरीही शिर्डीत होणाऱ्या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांना नेमक कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, याबाबत अद्यापही अधिकृत माहिती रुग्णालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आलेली नाही.