मुंबई:राज्यातील महाविकास आघाडीची एकता कायम राहावी, असे माझे प्रयत्न आहेत; मात्र अद्याप कोणत्याही सूत्राच्या आधारे जागावाटप झालेले नाही. आघाडीतील जागावाटप बद्दलचे 'ते' वक्तव्य होते. मी सध्याच्या परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. मी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
वज्रमूठ सभेला शरद पवार नसणार?मुंबईतील बीकेसी येथे १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभेला उपस्थित असल्याचे प्रथम बोलले जात होते. त्यामुळे वज्रमूठ सभेला आगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि त्यानंतर राज्यात होणाऱ्या वज्रमूठ सभेला देखील शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांची नागपूरच्या सभेला उपस्थिती: राज्यात आतापर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने दोन मोठ्या सभा पार पडल्या. त्याला देखील शरद पवार उपस्थित नव्हते. ते हे मोठे नेते आहे. वज्रमूठ सभा ह्या आमच्या लेव्हलच्या असल्याचे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तसेच नागपूरच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार नाही, अशा पद्धतीच्या माध्यमातून बातम्या येत होत्या. तरी देखील ते नागपूरच्या सभेला उपस्थित होते.