मुंबई: लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्या प्रवृत्ती आहेत. अशा प्रवृत्तीच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यायची हे आव्हान आहे. त्या आव्हानाला सामोरे जाणे आपले सर्वांचे कर्तव्यच नाही तर धर्म असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करण्याचे काम होत आहे.
शेतकरी दुखावला:शेतकरी अस्वस्थ झाला असून दुखावलेला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आपला शेतीमाल साठवून ठेवत आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. मोदींनी तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करू सांगितले. पण केले नाही. मात्र दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात राज्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Sharad Pawar News: विद्वेष वाढवणार्याच्या हातात सत्ता न देणे आपला धर्म - शरद पवार - शरद पवार राष्ट्रवादी वर्धापनदिन कार्यक्रम
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार व शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील दंगलीचे वाढलेले प्रमाण, मणिपूरमधील अशांतता, शेतकऱ्यांचे प्रश्न व संसदभवनाचा सोहळा यावरून त्यांनी सरकारला प्रश्न उपस्थित केले.
![Sharad Pawar News: विद्वेष वाढवणार्याच्या हातात सत्ता न देणे आपला धर्म - शरद पवार NCP Anniversary program in Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-06-2023/1200-675-18814970-thumbnail-16x9-ncpprogram.jpg)
जनतेने आपल्या हातात सत्ता दिली. गेल्या पंचवीस वर्षात जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यात आपल्याला यश आले. सर्वच घटकातील लोकांचा विचार राष्ट्रवादी पक्षाने केल्यामुळे राज्यातील जनतेने याची नोंद घेतली- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
सत्ताधारी राग काढत आहेत-कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे. शांतिप्रिय राज्याची ओळख मात्र आता जातीय दंगली घडत आहेत. सत्ताधारी नाही त्याठिकाणी राग काढण्याचा प्रकार करत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखली जात नसेल तर दंगलीच्या स्वरूपात किंमत मोजावी लागते. लहान घटकांना संरक्षण देण्याचे सरकारचे काम आहे. २३ जानेवारी २३ मे २०२३ पर्यंत ३१५२ मुली व महिला गायब आहेत. भगिनींचे संरक्षण करण्यात सरकार काय करतेय, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. मणीपूरमध्ये दररोज दंगली होत आहेत. सीमेवर मणिपूर आहे. चीनच्या सीमेवर काही भाग येतो आहे. त्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर काय उपयोग? याविषयी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.
फक्त माझे नाव -काही दिवसापूर्वी संसदेतील कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण दिले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींना बोलावले असते तर प्रोटोकॉल पाळला गेला असता. म्हणून त्यांना न बोलवण्याचे कारण समोर आले आहे. प्रत्येकाने पदांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. फक्त माझच नाव त्याठिकाणी असले पाहिजे दुसरे कुणाचे चालणार नाही, असा नाव न घेता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
हेही वाचा-