मुंबई - महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले आहे. शनिवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या टि्वटनंतर शरद पवार यांनीदेखील टि्वट करून पलटवार केला आहे. भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसून अजित पवार दिशाभूल करत आहेत, असे शरद पवार यांनी टि्वट करून स्पष्ट केले आहे.
अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार - शरद पवारांचा पलटवार
महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले आहे. शनिवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आज अजित पवार यांचे ट्विटवर टि्वट येत असून त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या विविध नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या सरकारला शरद पवार यांचा पाठिंबा असून तेचे आमचे नेते आहेत, असा विश्वास अजित यांनी व्यक्त केला. भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार राज्याला लाभेल. पुढील पाच वर्षे प्रामाणिक काम करून राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. त्यासाठी थोड्या संयमाची गरज असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
राज्यभरात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सत्तास्थापनेसाठी नवीन समीकरण जुळून येत असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.