महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा-प्रफुल पटेल - Praful Patel in NCP meeting

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष पदाच्या राजीनाम्या संदर्भात शुक्रवारी सकाळी पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येणार आला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रफुल पटेल यांनी प्रस्ताव मांडला आहे.

Proposal to Reject Sharad Pawar Resignation
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता

By

Published : May 5, 2023, 11:16 AM IST

Updated : May 5, 2023, 12:17 PM IST

शरद पवारांचा निवड समितीने राजीनामा फेटाळला

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष पदाच्या राजीनाम्या संदर्भात शुक्रवारी सकाळी पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात आला आहे. शरद पवारांनी अध्यक्ष पदी राहावे, अशी निवड समितीने भूमिका घेतली आहे. राज्यातील सगळ्यांचे लक्ष आजच्या पक्षाच्या बैठकीकडे लागले होते.

प्रफुल पटेल म्हणाले, की शरद पवार यांनी या पदावरून सोडून जाऊ नये, अशी राज्यातील अनेक नेत्यांच्या भावना आहे. कार्यकर्ताच्या मनात दुःख आणि नाराजी आहे. शरद पवार साहेब यांनी आम्हला विश्वासात न घेता निर्णय घेतला. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय केला होता. त्यांचा राजीनामा नामंजूर एकमताने मंजूर करण्यात आला आहे. पवार यांनीच अध्यक्ष पदावर राहावे, अशी आम्ही विनंती केली आहे. पवारांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा, असेही समितीने म्हटले आहे. आम्ही नवीन अध्यक्ष निवडू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.



प्रफुल्ल पटेल राजीनामा बाबतचा प्रस्ताव मांडतील : प्रदेश कार्यलयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता बैठकीला सुरवात झाली आहे. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन तयार करण्यात आलेल्या कार्यकारिणी सदस्य आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल राजीनामा बाबतचा प्रस्ताव मांडला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याविषयीचा असणार आहे. यावर सर्व कार्यकारणी सदस्य एकमताने पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांना कार्यकारणी समितचा हा निर्णय मान्य झाला नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष पदाच्या नावावर एकमत करण्यात बाबतचा प्रस्ताव मांडला जाऊन तो एक मताने मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



कालच शरद पवारांचे सुचक विधान : काल वाय बी सेंटरला शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी गेल्या तीन दिवसापासून घोषणाबाजी सुरू होती. राजीनामा मागे घेतल्या शिवाय उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांची समजूत काढण्यासाठी जेष्ठ नेते येऊनही कार्यकर्ता हलण्यास तयार नव्हता. भावुक झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत सुप्रिया सुळे यांनी काढली. त्यानंतर संध्याकाळी स्वतः शरद पवार त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटले. मी माझा निर्णय येत्या एक दोन दिवसात घेईल. त्यासोबत कार्यकारणी समिती जो निर्णय घेईल. तो मला मान्य राहील असे देखील सांगितले होते. त्याचं अनुषंगाने आज होणाऱ्या समित्याच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. कार्यलय बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. साहेबांशिवाय पर्याय नाही, अशा आशयचा मजकूर बॅनरवर पाहायला मिळत आहे. सकाळपासून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते कार्यलय परिसरात जमल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :Sharad Pawar Resign: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पद कोणाला मिळणार? पक्ष निवड समितीची आज बैठक

Last Updated : May 5, 2023, 12:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details