महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदराने संभाजी महाराजांना केलेले कोणतेही संबोधन योग्यच, शरद पवारांची स्पष्टोक्ती - Ajit Pawar on Sambhaji Maharaj

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले किंवा स्वराज्य रक्षक म्हटले तरी दोन्ही योग्यच आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आस्थेने आदराने केलेले संबोधन अयोग्य म्हणणे हे योग्य नाही असे पवारांनी स्पष्ट केले.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Jan 3, 2023, 6:51 PM IST

Updated : Jan 3, 2023, 8:44 PM IST

शरद पवारांची स्पष्टोक्ती

बारामती:अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj ) यांच्याबद्दल केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar reaction ) यांनी भूमिका मांडली आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले किंवा स्वराज्य रक्षक म्हटले तरी दोन्ही योग्यच आहे, (Ajit Pawar on Sambhaji Maharaj ) असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

आस्थेने आदराने केलेले संबोधन अयोग्य म्हणणे हे योग्य नाही असे पवारांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar on Sambhaji Maharaj) उलट ठाण्यात काही नेते एका नेत्याला धर्मवीर म्हणतात, त्यावरुन काही वाद होऊ नये याची काळजी वाटते असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांचे नाव न घेता पवारांनी चिमटा काढला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला आहे. यानंतर महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजप आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. 2 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. या दरम्यान स्वतः अजित पवार हे 2 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर आले नाहीत. सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार आले असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर भाष्य केले आहे.

अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येऊन बोलतील असे सुतोवाच देखील केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल, त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते.

काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आणि वादावर पडदा टाकावा असे आवाहन केले आहे.

कोणी धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील, तर त्यांच्याबाबत माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे. त्याला ते मत मांडण्याचा पुर्णतः अधिकार आहे. ज्याला जो उल्लेख करायचा तो उल्लेख करु शकता. पण “धर्मवीरबद्दल मला एक काळजी वाटते. मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा काही नेत्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एकेकाळचे सहकारी होते, त्यांचा उल्लेख ते अनेकदा करतात. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते, त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो. त्यासाठी वाद घालण्याचे काही कारण नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. त्यामुळे त्यावर वाद घालण्याचे कारण नाही, असे आवाहन करत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर भाष्य करण्याचे शरद पवारानी टाळले आहे.

Last Updated : Jan 3, 2023, 8:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details