मुंबई- कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीचा फटका देशासह राज्याच्याही तिजोरवर बसणार आहे. कारण, टाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले असून अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट होणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवार जनतेशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, अनेकांचे रोजगार बुडाले, कारखाने-उद्योग बंद झालेत. महाराष्ट्र सरकारचा 2020-21चा अर्थसंकल्प पाहिल्यास त्यात राज्याचे महसूल उत्पन्न हे 3 लाख 47 हजार कोटींच्या आसपास होते. पण, आजची स्थिती पाहता या महसुलात तूट पडेल. ही महसुली तूट 1 लाख 40 हजार कोटी इतकी असेल. म्हणजे एकूण महसूलापैकी 40 टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम राज्याच्या इतर विकास कामांवरदेखील होऊ शकतो. या सगळ्या प्रश्नांची देशाच्या प्रधानमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत भारत सरकारनेच राज्यांना सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षाही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.
कोरोना संकट संपल्यानंतर बेरोजगारीचे संकट येणार