मुंबई: राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. ५ महिन्यात १९ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. याची राज्य सरकारनं गांभीर्यानं नोंद घ्यावी, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय बी सेंटरमध्ये पत्रकार परिषद यांनी व्यक्त केले. कंत्राटी पद्धतीनं होणाऱ्या पोलीस भरतीबाबतही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यातील अनेक सरकारी रुग्णालये आणि शिक्षणसंस्थांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, प्राथमिक शाळांमध्ये ३० हजार पदे रिक्त आहेत. शासकीय शाळा दत्तक देण्याला शिक्षक संघटनांकडून विरोधत होत आहे. दत्तक दिलेल्या शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. दत्तक घेतलेल्या शाळांना कंपन्यांना नाव देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबतही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या दोन निर्णयावरून शरद पवारांची नाराजी-शरद पवार यांनी राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कंत्राटी पद्धतीने भरती यावरून राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार म्हणाले, यावर्षी १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान राज्यातून १९,५५३ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांमध्ये ३ हजार कर्मचार्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. त्यावरूनही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका केली.