नवी दिल्ली:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा नामोहरण करण्यासाठी विरोधकांकडून ऐक्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
अदानीनंतर जेपीसीबाबत शरद पवारांनी यू-टर्न घेतल्यानंतर काही दिवसांनंतरच ही बैठक झाली आहे. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पाटण्यात भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेदेखील होते गेल्या काही दिवसांपासून काही विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध युती करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती. बुधवारी नितीश यांनी खर्गे आणि राहुल यांची आणि गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांची भेट घेतली.
एकमेकांना पाठिंबा देऊ विरोधकांशी लढूआम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नितीश कुमार यांची भेट घेतली होती. बुधवारी त्यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरएलडी नेते तेजस्वी यादव होते. बुधवारच्या बैठकीला त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, विरोधी पक्षाचे नेते पवार म्हणाले की, त्यांना दिल्लीतील बैठकीत सामील होण्यास सांगितले होते. परंतु पुण्यात काम असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. शरद पवार म्हणाले, की आम्ही सर्व एकमेकांना पाठिंबा देऊ विरोधकांशी लढू. उद्या दिल्लीमध्ये सर्व नेत्यांना भेटणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना त्यांनी उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. दुसरीकडे अजित पवार यांनी सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे सांगत संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिला होता.
उद्धव ठाकरेंनी नुकतेच शरद पवारांची घेतली भेटअजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतेच सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याच्या राजकारणात आम्ही एकत्र काम करत आहोत. काही प्रश्नावर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीतस सर्वांनी एका विचाराने काम करावे.
हेही वाचाSharad Pawar News: काही प्रश्नावर वेगळी मते असली तरी, एका विचाराने काम करणार- शरद पवार