महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांनी घेतली ईव्हीएम विरोधी जनआंदोलन कार्यकर्त्यांची भेट - evm

ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर या आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. आता पवार लवकरच ईव्हीएम विरोधी आपली भूमिका मांडतील असा विश्वास ईव्हीएम विरोधी जन आंदोलन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

By

Published : Jun 9, 2019, 11:15 PM IST

मुंबई- ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर या आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. आता पवार लवकरच ईव्हीएम विरोधी आपली भूमिका मांडतील असा विश्वास ईव्हीएम विरोधी जन आंदोलन कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ईव्हीएम विरोधी जन आंदोलन कार्यकर्त्यांची पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर कार्यकर्त्यांनी हा विश्वास दाखवला.

ईव्हीएमचा कसा गैरवापर होऊ शकतो याबाबत पवार यांना जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. यावेळी रवी भिलाने आणि फिरोज मिठीबोरवाला हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार यांनी लोकसभेत राष्ट्रीय महाआघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भाजपकडून वारंवार ३०० जागा जिंकण्याचे आव्हान केले जात होते. त्यावेळी पवार यांनी ईव्हीएम बाबत घोळ असल्याचे सांगत विरोध दर्शवला होता. यासंदर्भात आता ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाने पवार यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता, असे भिलाने यांनी सांगितले. तर येत्या १२ तारखेला ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची मुंबईत एक परिषद होत असून याबाबत विविध नेत्यांशी याबाबत चर्चा करत असल्याचे फिरोज मिठी बोरवाला यांनी सांगितले.

पवारांनी यावेळी उपस्थित असलेल्या तज्ज्ञांकडून तब्बल अर्धा तास ईव्हीएम मधील घोटाळ्याबाबत माहिती जाणून घेतली. आता पवार हे ईव्हीएम बाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details