मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत राज्याची कोरोना परिस्थिती, आरक्षणाचा मुद्दा आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.
माहिती देताना मंत्री एकनाथ शिंदे हेही वाचा -पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज
राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजले आहे. यासोबतच राज्यातील कोविडची परिस्थिती, ग्रामीण भागात रुग्णांची वाढती संख्या, लॉकडाऊन आणि राज्यासमोर उपस्थित झालेल्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न, तसेच पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर याबाबत देखील या भेटीदरम्यान चर्चा झाली असल्याचे समजले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पित्ताशयाचे दोन ऑपरेशन झाले आहेत. तसेच, तोंडाच्या अल्सरचेही ऑपरेशन झाले होते. या नंतर पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपल्या कामांना सुरुवात केली आहे. राज्यात असलेल्या काही प्रश्नांच्या संदर्भात शरद पवार यांची काही लोकांनी भेट घेतली. याबाबत देखील शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शरद पवार यांच्या कामाच्या जिद्दीला सॅल्युट केला पाहिजे, असेही शिंदे यांनी म्हंटले.
हेही वाचा -दोन शाळकरी मुलांचा पुढाकार; म्यूकरमायकोसिस विरोधात लढण्यास जमा करतायेत फंड