मुंबई:यशवंतराव सभागृहामध्ये ते वि. का. राजवडे संशोधन मंडळाच्या वतीने सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात एकाच मंचावर पाहायला मिळाले.
नवीन राजकीय चर्चेला उधाण:महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षांत अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधील पडलेली फूट आणि भाजपसोबत गेलेले अजित पवार यामुळे महाविकास आघाडी कुमकुवत झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात यशवंतराव चव्हाण सभागृहातील कार्यक्रमात सूचक वक्तव्य केल्यामुळे नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंचे कौतुक:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. त्यांना गडांविषयी माहिती आहे. तसेच त्यांच्या फोटोग्राफीत आपल्याला हे प्रत्यक्षात पाहायला मिळते. ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अनेक संस्थांना त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. मधल्या काळात 5 कोटींची देणगी मी ह्या संस्थांना दिली होती. यशवंतराव चव्हाण सेंटर संस्थेतर्फे 50 लाखांचे अनुदान शरद पवार यांनी जाहीर केले.
'मविआ'ला जास्त जागा मिळतील: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल घाणेरडे वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचा देशाने निषेध करावा इतका मोठा गुन्हा त्यांनी केला आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वांत जास्त जागा मिळतील, असा विश्वास मला असून जनता आमच्यासोबत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आता प्रियंका चतुर्वेदी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, या देशात काय चाललंय हाच प्रश्न आहे. एक आमदार एका महिलेबद्दल असे बोलतो हे निंदनीय आहे. तसेच राज्याला लवकरच विरोधी पक्षनेता मिळेल, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
- Aaditya Thackeray : सडक्या विचारांचे लोक राजकारणात...; आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Pravin Darekar : उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल; Watch Video
- Sanjay Raut on Manipur : मणिपूरबाबत खालच्या थराला जाऊन भाजपाची टीका म्हणजे...; संजय राऊतांचा हल्लाबोल