महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीएसआर फंड मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून द्यावा - sharad pawar facebook live

निगमित सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड हा मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. सध्या हा निधी फक्त पीएम केअर फंडमध्ये जमा केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Apr 15, 2020, 11:47 AM IST

मुंबई - निगमित सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड हा मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. सध्या हा निधी फक्त पीएम केअर फंडमध्ये जमा केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

काय म्हणाले पवार?

यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही स्तुतीही केली. पवार म्हणाले, उद्धव ठाकरे सातत्याने राज्यातील जनतेशी सुसंवाद करत आहेत आणि जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इतर राज्यप्रमुखदेखील त्या-त्या राज्यातील जनतेशी चांगला सुसंवाद साधत आहेत. यापूर्वीचा लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिल पर्यंतचा होता. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्याची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली. त्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे. तसेच एकंदरित परिस्थिती बघता देशातील स्थिती चिंताजनक आहे. अमेरिका, चीन, इटली येथील परिस्थिती भयावह आहे. भारताचा विचार करता सामूहिक प्रतिकार शक्ति भारतात जास्त आहे, असे तज्ञ सांगतात. मात्र, आताचा आकडा बघता सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत देशात 377 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वैद्यकीय सेवा, अन्यधान्यांची पूर्तता करण्यासंदर्भात खबरदारी घेण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्रातील कामगार यांचीही परिस्थिती गंभीर आहे. मात्र, या कामगारांना मदतीसाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच अनेक सेवाभावी संस्थाही मदतीसाठी पुढे येत आहेत. डॉक्टर्स, नर्स हे आपल्या जिवांची चिंता न करता पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. म्हणून येणाऱ्या काळात आपण या संकटातून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील 9 लाख नागरिकांना धान्य वितरित करण्यात आले आहे. केशरी शिधा पत्रिका धारक यांना 2 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील 10 कोटी लोकांना धान्य वितरित करण्याची तयारी करण्यात येत आहे. यासर्वांचा अर्थकारणावर नक्कीच परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रावरही संकट ओढावले आहे. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच आगामी मे महिन्यात पिण्याचे पाण्यासाठी कमतरता न यावी, यासाठी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. तसेच या सर्व संकटाला सामोरे जाण्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे.

हेही वाचा -जगभरात कोरोनाग्रस्त 20 लाखांच्या जवळ; तर अमेरिका सहा लाखांच्या उंबरठ्यावर

कोरोना ही काही 2-3 महिन्यांचा विषय नाही. या संकटाला वर्ष ते 2 वर्षही लागू शकतो. केंद्र सरकार चांगले निर्णय घेत आहे. मात्र, याव्यतिरिक्तही त्यांनी अनेक चांगले निर्णय घेण्याची गरज आहे. सीएसआर फंड ही राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून दिली तर मदत होईल. तर बांद्रा रेल्वे स्थानकावर जे घडले ते दुर्देवी आहे. कोणीही अफवा पसरवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. देशावर संकट आले असताना राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आज आपण सर्वांनी मिळून कोरोनाचा पराभव करण्याचा एक कलमी कार्यक्रम आपल्यापुढे आहे. अस्वस्थ समाजातील घटकांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details