संजय राऊतांबाबत आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया मुंबई: शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा परत घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुद्धा मोठा प्रमाणात दबाव त्यांच्यावर निर्माण झाला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समितीनेसुद्धा तशा पद्धतीचा ठराव संमत केला. परंतु या सर्व घडामोडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील नेतेही यावर जास्त भाष्य करताना आढळत नाही. इतर पक्षांचे नेतेही काही बोलत नसताना, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत मात्र यावर वारंवार बोलत आहे. ते पवार कुटुंबामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत शकूनी मामा:याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, संजय राऊत हे पवार कुटुंबामध्ये कलह निर्माण करण्याचे काम करत आहेत. सुप्रिया सुळे व अजित दादांमध्ये भांडण लावण्याचे कामसुद्धा ते करत आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्ष कोणी सांभाळायला पाहिजे, हे फक्त संजय राऊत सोडून कुठलाच राजकारणी या विषयावर बोलताना दिसन नाही; परंतु संजय राऊत विनाकारण या विषयावर भाष्य करत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असून संजय राऊत विनाकारण त्यांच्या पक्षात व कुटुंबात डोकावत आहेत. म्हणूनच संजय राऊत यांना शकूनी मामाची उपमा दिली असल्याचही नितेश राणे यांनी सांगितले आहे.
पवार हे राऊतांचा फोनही घेत नाहीत:महत्त्वाचे म्हणजे, शरद पवारांच्या या निर्णयानंतर भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसून फक्त संजय राऊत या विषयावर बोलत आहेत. शरद पवारांनी "लोक माझे सांगाती" या त्यांच्या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांची भूमिका, महाराष्ट्रा पासून मुंबईला तोडणे व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांची कारकीर्द या सर्व विषयावर भाष्य केले आहे. या पुस्तकावरसुद्धा संजय राऊत यांनी टीका केली असून अशी खूप पुस्तक येतात व ग्रंथालयात पडून राहतात, असेही म्हटले आहे. एकंदरित या विषयावर आता शरद पवार हे संजय राऊत यांचा फोनही घेत नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीत शरद पवारांनी घेतलेली भूमिका व त्यावर संजय राऊत यांनी केलेली टिपण्णी यामुळे शरद पवार नाराज असल्याचेही सांगितले जात आहे.
चित्रपटाचा शेवट झाल्यावर प्रतिक्रिया:आतापर्यंत या विषयावर भाजपकडून कुठल्याही नेत्याने विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही भाष्य केले नव्हते; आता फडणवीस म्हणाले आहेत की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी हा त्यांचा अंतर्गत चित्रपट असून कलावंत व पटकथा ही अंतर्गत आहे. तसेच जोपर्यंत सुरू असलेल्या या चित्रपटाचा शेवट होत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया कशी देऊ शकतो? या चित्रपटाचा शेवट समजेल, तेव्हा त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल, अशी मार्मिक टिपण्णीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा:The story behind arrest Kurulkar : कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी