महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - शरद पवार

ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता, पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, अशी टीकाही पवार यांनी केली.

शरद पवार

By

Published : May 1, 2019, 5:31 PM IST

मुंबई - गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता, पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, अशी टीकाही पवार यांनी केली. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचा हल्ला ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्रदिनी गडचिरोलीतील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात १६ पोलीस मृत्यूमुखी पडले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details