महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar Resign Rejected : शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय गुलदस्त्यात, राजीनामा एकमताने फेटाळला - NCP president Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, पवारांच्या या भूमिकेला कार्यकर्ते,नेत्यांनी विरोध केला आहे. शरद पवार यांनीच पक्षाचे कायम अध्यक्ष राहावे, यावर कार्यकर्ते ठाम आहेत. अध्यक्ष निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे.

Sharad Pawar Resign Rejected
Sharad Pawar Resign Rejected

By

Published : May 5, 2023, 3:37 PM IST

मुंबई :शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेनंतर प्रफुल पटेल आणि समिती सदस्य माहिती देण्यासाठी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवार यांनी विचार करण्यासाठी वेळ द्यावी, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

आम्हला कल्पना नव्हती :लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशन सोहळ्या वेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष पद कोणाकडे दिले जाऊ शकते. कार्यकारी समिती गठीत करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे माझ्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. शरद पवारांनी स्वतः भाषणातून देखील सांगितलं होतं. थोडी देखील कल्पना आम्हाला कोणालाही नसल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांना आपल्या निर्णयावर चा फेरविचारावा करावा या संदर्भात वारंवार भेटी घेत होतो.

देशातील अनेक नेत्यांच्याही भावना :शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहे. त्यांच्या कार्याचा आवाका फार मोठा आहे. आम्ही जेव्हा पंजाब राज्यात गेलो होतो तेव्हा देखील तेथील शेतकऱ्यांनी तात्कालीन मंत्री असताना तसेच त्यानंतर शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचे कौतुक केलेले पाहायला मिळाले होते. देशातील वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी मला आणि खासदार सुप्रिया सुळे यांना फोन द्वारे संपर्क करून माहिती घेतली आणि शरद पवार विचार करावा अशी विनंती देखील केली होती.

काय आहे ठराच :शुक्रवारी सकाळी 11 वाजता 15 सदस्य असलेल्या समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये सर्वांच्या संमतीने
एक ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नाम मंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे. सदर ठरावात शरद पवार यांच्या राजीनामाचा ठराव एकमताने नामंजूर करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिल्वर ओकवर दाखल :समितीचा ठराव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समितीचे नेते पोहोचले. यावेळी सर्व समितीचे सदस्य प्रफुल पटेल,अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांना बैठकीतला प्रस्तावा बाबत माहिती, ठरवा बाबत माहिती दिली. आपण पदावर कायम राहावे अशा प्रकारची विनंती केली, शरद पवार यांनी ठराव बाबत विचार करण्याची थोडा वेळ द्यावा अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.


हेही वाचा - Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा-प्रफुल पटेल

ABOUT THE AUTHOR

...view details