मुंबई - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांनी त्यांचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. ते आज मुंबईतील यशंवतराव चव्हान सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोक माझे सांगाती आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन वेळी अध्यक्ष पदावरुन निवृ्त्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उलथली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, माझे सांगाती असलेल्या जनतेत अस्थिरता निर्माण झाली होती. मी माझ्या निर्णयाचा फेर विचार करावा अशी मागणी असंख्य कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच माझे हितचिंतक, माझे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन माल राजीनामा मागे घेण्याचे अव्हान केले.
कार्यकर्त्यांच्या भावानाचा आदर :देशातून राज्यातून विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी ही विनंती केली. लोक माझे सांगती हे माझ्या जीवननाचे गमक आहे. माझ्याकडून अशा भावाचा अनादर होऊ शकत नाही. जनतेमधील विश्वासामुळे मी भारावून गेलो आहे. मी माझ्या निर्णय मागे घेत आहे. समितीने घेतलेल्या निर्णयाचा मी विचार केला असून देशातील कार्यकर्त्यांच्या भावानाचा आदर राखत मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्विकारत आहे. मी संघटनेमध्ये उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे असे प्रतिक्रिया शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करणार :माझ्या कार्याकाळात संघटनात्मक, नविन नेतृ्तव निर्माण करण्यासाठी सहकार्यांची मदत घेणार आहे. यापुढे राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष प्रतिमा जनमानसात वाढवण्यासाठी जोमाने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपण दिलेली साथ हीच माझी प्रेरणा आहे. माझ्या जीवनात तुम्ही सर्व यश-अपयशात सांगाती राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा अभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.