मुंबई -झारखंड विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी भाजपला जोरदार फटका बसला आहे. या निकालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. झारखंडच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे की, देशातील जनता भाजपच्या विरोधात आहे. केंद्रातल्या सत्तेसह आर्थिक ताकद वापरुनही झारखंडमध्ये त्यांचा पराभव झाल्याचे पवार म्हणाले.
भाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारले - शरद पवार - झारंखंड निकाल
झारखंड विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी भाजपला जोरदार फटका बसला आहे. या निकालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
झारखंड निकालानंतर शरद पवार यांनी मुंबईतल्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य केले. सगळी सत्ता वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपच्या अहंकारी राजकारणाला नाकारले आहे.. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो असेही पवार म्हणाले.
भाजपला उतरती कळा
झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या ५ राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की, भाजपला उतरती कळा लागली आहे, आता ही उतरण थांबू शकणार नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.