मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज (मंगळवार) आपल्या पक्षातील सर्व मंत्री आणि महत्त्वाचा नेत्यांची बैठक प्रदेश कार्यालयात बोलवली होती. या बैठकीत राज्याची राजकीय परिस्थिती, कोविड परिस्थिती आणि राज्यातील लसीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यासोबतच सध्या राज्य सरकार समोर असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या मुद्द्यांवर देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच राज्यात लसीकरणाला लस कमी पडत असल्याने या बाबत सिरम कंपनीचे सीईओ अदर पुनवाला यांच्याशी देखील शरद पवार चर्चा करणार असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
'महाविकास आघाडीचे सरकार पंचवीस वर्षे चालणार'
विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. शरद पवार हे आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामांना सुरुवात केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र भारतीय जनता पक्षातील नेते आणि कार्यकर्ते चलबिचल होऊ नये, म्हणून भारतीय जनता पक्षाकडून या भेटीबाबत भ्रम पसरवले जात असल्याचे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्य सरकारला कोणताही धोका नसून, महाविकास आघाडी सरकार पाच नाहीतर पंचवीस वर्ष महाराष्ट्रात टिकून राहील, असा विश्वास देखील नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
'सहकारी बँका संपवण्याचा केंद्र सरकारचा दावा'