मुंबई : शिवसेना-भाजप हे एकमेकांचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे कोणी कोणाला खोटं ठरवू नये, एकमेकांचे ऐकावे, मी एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सांगतो, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सेना-भाजपला दिला.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. देशातील सर्व नागरिकांनी याचे स्वागत करून शांतता राखावी. हा निर्णय एका राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे. भाजप-शिवसेनेने सरकार बनवावे, आम्ही विरोधात कधी बसणार याची वाट बघत आहोत, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - जनता त्रस्त आमदार मस्त; शिवसेनेचे 'द रिट्रीट' मधील आमदार समुद्रकिनारी
राम मंदिराच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वडाळा येथील राम मंदिराच्या भेटीला जात आहेत, त्यावर पवार म्हणाले की, कोणी मंदिरात जावे, मशिदीत जावे, हा ज्यांचा-त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते कुठे जात आहेत, हा विषय महत्त्वाचा नाही. मात्र, न्यायालयाने जो निर्णय दिला तो संतुलित निर्णय आहे. तो स्वीकारला जावा, असे सांगत पवार यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले.
हेही वाचा -...तर 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार - उद्धव ठाकरे