मुंबई - देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच याबाबत विधान केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपच्या प्रमुख मायावती हे पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांचे भाकीत.. एनडीएला बहुमत न मिळाल्यास 'हे' होऊ शकतात पंतप्रधान - mayavati
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच पंतप्रधान पदाबाबत विधान केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपच्या प्रमुख मायावती हे पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान पदाबाबत एक भाकीत केले आहे. एनडीएला बहुमत न मिळाल्यास ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती हे पंतप्रधान होऊ शकतात असे शरद पवार यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीची ज्या वेळेस चर्चा होते, त्यावेळेस पंतप्रधान पदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत येते. मात्र, पवारांनीच याबद्दल खुलासा केला आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. त्यामुळे ते पंतप्रधान पदासाठी योग्य पर्याय ठरू शकतात असे पवारांनी म्हटले आहे.