महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'डॉ. आंबेडकरांचे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरल्याशिवाय राहणार नाही' - आंबेडकरांचे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरेल

इंदू मिलमध्ये होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे सर्वच देशांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. हे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरल्याशिवाय राहणार नाही. जो विचाराने आंबेडकरवादी आहे असा घटक स्मारकाच्या पदस्पर्शासाठी उत्सुक असेल असेही पवार म्हणाले.

Dr. Babasaheb Ambedkar Memorial
डॉ. आंबेडकरांचे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरेल

By

Published : Jan 22, 2020, 9:33 AM IST

मुंबई - इंदू मिलमध्ये होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे सर्वच देशांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. हे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरल्याशिवाय राहणार नाही. जो विचाराने आंबेडकरवादी आहे असा घटक स्मारकाच्या पदस्पर्शासाठी उत्सुक असेल, असेही पवार म्हणाले. लोक न्यूयॉर्कमध्ये 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' बघायला जातात, तसेच भविष्यात हे स्मारक बघायला येतील असे पवार म्हणाले.

दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची शरद पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एक आव्हान समजून काम केल्यास २ या स्मारकाचे काम पूर्ण करणे शक्य असल्याचे पवार म्हणाले. हे स्मारक झाल्यानंतर शेजारी चैत्यभूमी आणि इंदू मिल येथील हे स्मारक असा दुहेरी संगम लोकांना पाहायला मिळेल असे पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावीत जागेची पाहणी करताना शरद पवार

आपण अनेक वर्ष बघत आहोत, की ६ डिसेंबर व १४ एप्रिल या दिवशी हजारो लोक इथे येतात. हे स्मारक झाल्यानंतर या संख्येत अनेकपटींनी वाढ होईल. प्रत्येक व्यक्तीला स्मारकाला भेट देण्याची इच्छा होईल असेही पवार म्हणाले. काही कमतरता असल्यास त्या दूर करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. शिवस्मारक, .आंबेडकर स्मारक अशा गोष्टी एकदाच होतात. त्यामुळे त्यासाठी काटकसर करण्याची आवश्यकता असणार नाही. न्यूयॉर्कमध्ये 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' बघायला लोक जातात, तसेच भविष्यात हे स्मारक पाहण्याची लोकांची इच्छा असेल असेही पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details