ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल; राजकीय घडामोडी बदलण्याची शक्यता - sharad pawar on political crisis

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकणचा दौरा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. ते आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. तूर्तास त्यांनी माध्यमांशी बोलण्यास टाळले असले तरी दुपारनंतर या ठिकाणी अनेक नेते पवार यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

शरद पवार मुंबईतील निवास्थानी दाखल
author img

By

Published : Nov 8, 2019, 2:06 PM IST

मुंबई -तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी (९ आक्टोंबर) संपत आहे. त्यामुळे रात्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकणचा दौरा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. ते आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. तूर्तास त्यांनी माध्यमांशी बोलण्यास टाळले असले तरी दुपारनंतर याठिकाणी अनेक नेते पवार यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

शरद पवार मुंबईतील निवास्थानी दाखल

हेही वाचा -'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहणे हा महाजनादेशाचा अपमान'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आज (शनिवारी) मुंबईत उपस्थित असून या पार्श्वभूमीवर सिल्वर बंगल्यावर दुपारनंतर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या पूर्वी सिल्वर ओक बंगल्यावर आमदार भारत भालके यांच्यासह इतर आमदार उपस्थित असून अनेक नेते थोड्यावेळात येणार असल्याची माहितीही ही समोर येत आहे.

हेही वाचा - भाजपचे सरकार येणे शेतकरी हिताचे नाही - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details