मुंबई :शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. (Sharad Pawar called meeting of NCP executive). उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ती बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत पक्षाची तयारी बाबतचा आढावा देखील या बैठकीतून घेतला जाणार आहे. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. (meeting of NCP executive).
Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची बैठक - जयंत पाटील
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांनी 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. सीमावादावर तोडगा न निघाल्यास स्वतः शरद पवार यांनी बेळगावला जाण्याचा इशारा दिला होता. त्या अल्टीमेटम बाबत शरद पवार (Sharad Pawar) बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. (meeting of NCP executive).
शरद पवार माध्यमांशी संवाद साधणार :महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. दोन राज्यांमध्ये सुरू असलेल्या या वादावर शरद पवार यांनी 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. सीमावादावर तोडगा न निघाल्यास स्वतः शरद पवार यांनी बेळगावला जाण्याचा इशारा दिला होता. त्या अल्टीमेटम बाबत देखील बैठकीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.