मुंबई- आपल्याकडे उत्तम साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी संचारबंदीच्या काळात बाहेर न पडता विविध पुस्तकांचे वाचन करावे. वाचनामुळे आपले ज्ञान आणि व्यक्तिमत्व वाढते. त्यामुळे संचारबंदीच्या काळात तरुणांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावित, असे आवाहन राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, की संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. या व्यतिरिक्त महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे विपुल लिखाण आपल्या साहित्य क्षेत्रात उपलब्ध आहे. त्याचा आस्वाद घेऊन आपले ज्ञान वाढवण्याचे काम करा, असे सुचविले.